स्वरकिमयाची सुरुवात 2014 या सालापासून साध्या चित्रकलेने झाली. चित्रकला शिकवत असताना मुलाचे हस्ताक्षरही सुंदर होते हे लक्षात आले आणि हस्ताक्षर वर्ग सुरू केले. हस्ताक्षराचा वर्ग घेत असताना हस्ताक्षरांवरून स्वभाव ओळखला जातो आणि बदल ही घडविता येतो हे लक्षात आले. त्यानंतर 2017 मध्ये ग्राफोथेरपिस्ट म्हणून स्नेहल चव्हाण यांनी पदवी पूर्ण केली ती यूएसए विद्यापीठातून केली आणि त्यानंतर आनंदबन शाळेच्या गतिमंद मुलांपासुन सुरुवात केली. या मुलांमध्ये खूप सुंदर बदल दिसून आले आणि लक्षात आले हे काम जर प्रत्येक मुलाला मिळाले तर समाजाला खूप मदत होईल हे लक्षात आले.
या सकारात्मक विचाराने, बदलामुळे 2017 ला स्वरकिमया पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी उदयाला आली आणि खऱ्या अर्थाने गुरुकुल शाळेपासून सुरुवात झाली. तसेच नॅबचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी स्वरकिमयाला एक सुवर्ण संधी दिली की जिल्हा परिषदेच्या 20 शाळांवर काम करण्याची त्यामध्ये सुवर्णसंधी दिली आणि त्या 20 शाळांमध्ये मुलांमध्ये सुंदर सकारात्मक बदल घडून आले त्यानंतर रयतच्या 15 शाळा मिळाल्या. स्वरकिमयाच्या टीमने हे दोन्ही प्रकल्प अतिशय सुंदर पद्धतीने यशस्वीपणे पूर्ण केले. लॉकडाऊनमध्येही स्वरकिमयाचे ऑनलाइन कामकाज सुरूच होते. याचाच परिणाम म्हणजे गुरुकुल शाळेत नर्सरी ते दहावी पर्यंत "विचार प्रक्रिया निर्मिती" हा विषय यशस्वीपणे कार्यरत आहे.
To improve the handwriting of 25000 students in the year 2023-24
In this new era of digitalization, she is now looking forward to help more and more children and audits to solve behavioral problems through her Online Handwriting Improvement Program and many other online courses and services.
Change your handwriting, change your life...